बारामतीत पोस्टर्स...दादा भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय

शिवाजीपार्कवर उद्या शपथविधी होणार आहे, त्या आधी बारामतीत अजित पवार यांच्या नावाचे पोस्टर्स झळकू लागले आहेत. 

Updated: Nov 27, 2019, 09:31 PM IST
बारामतीत पोस्टर्स...दादा भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय title=

मुंबई : शिवाजीपार्कवर उद्या शपथविधी होणार आहे, त्या आधी बारामतीत अजित पवार यांच्या नावाचे पोस्टर्स झळकू लागले आहेत.  या पोस्टरवर अजित पवार यांना भावी मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. अजितदादा आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आला आहात. म्हणून आता आपण थांबू शकत नाहीत, महाराष्ट्राने आपलं नेतृत्व मान्य केलं आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे, असं लिहिलेलं पोस्टर बारामतीत झळकत आहेत.

तर आता आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या, भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. 

अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं, आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती, मात्र हे सरकार काही तासात गडगडलं. यानंतर अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच आहोत असं म्हटलं आहे. अजित पवार महाविकास आघाडीत कोणतं मंत्रिपद स्वीकारतात, किंवा त्यांच्या वाटेला कोणतं मंत्रिपद येत हे लवकरच समजणार आहे.