मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॅंका पुढील चार दिवस बंद राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, उद्या दुसरी शनिवार आणि रविवारी बॅंकाना सुटीच आहे. मात्र, सोमवारी बॅंका नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. केवळ १५ आणि १७ ऑगस्टला सुटी आहे. त्यामुळे चार दिवस बॅंका बंद असल्याची केवळ चर्चाच आहे.
पुढचे चार दिवस बँका बंद राहणार नाहीत. सोमवारी बॅंकांचे व्यवहार सुरु रहाणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची वेबसाईट अशी कोणतीही सुटी असल्याचे दिसून येत नाही. पुढील आठवड्यात मंगळवारी स्वातंत्र्यदिन आहे. यंदा स्वातंत्र्यदिन आणि गोकुळाष्टमीनंतरचा गोपाळकाला एकाच दिवशी आहे. यामुळे सलग चार बँकांना सुटी नाही.
बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असते. यामुळे १२ आणि १३ ऑगस्टला बँका बंद आहेत. त्यानंतर मंगळवार, १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनानिमित्त बँका बंद असतील. तसेच १७ ऑगस्टला बॅंका बंद असल्याने जास्तीचा भार हा एटीएमवर असणार आहे.