दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणणारच! अंनिसचं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलं

चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाखांचं बक्षीस मिळावा हे शाम मानव यांनी दिलेलं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलंय.

Updated: Jan 21, 2023, 12:02 AM IST
दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणणारच! अंनिसचं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलं title=

Bageshwar Baba : आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा करणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) आणि दुसरीकडे अंनिसचे (Andhashraddha Nirmoolan Samiti) शाम मानव. गेल्या दिवसांपासून बाबा आणि अंनिसतल्या वादानं रान पेटलंय. चमत्कार सिद्ध करा आणि 30 लाखांचं बक्षीस मिळावा हे शाम मानव यांनी दिलेलं आव्हान बागेश्वर बाबांनी स्वीकारलंय. मात्र हे आव्हान स्वीकारताना त्यांनी नागपुरात येण्यास स्पष्ट नकार दिलाय. चमत्कार पाहायचाय तर आमच्या दरबारात या अशी अटच बाबांनी घातलीय. (Bageshwar Baba Challenge to Andhashraddha Nirmoolan Samiti latest marathi news)

दुसरीकडे बाबांची अट शाम मानव यांनी धुडकावून लावलीय. हिम्मत असेल तर नागपुरात या, इथंच काय तो सोक्षमोक्ष लागेल अशा शब्दात शाम मानव यांनी बाबांना सुनावलंय. याच दिव्य दरबारामुळे बागेश्वर बाबा चांगलेच चर्चेत आहेत. 

 

कोण आहेत बागेश्वर बाबा ? 
मूळ नाव धीरेंद्र गर्ग, मध्य प्रदेशातल्या छतरपूरमधील गढा गावात जन्म तर 2016 साली गावातील बागेश्वर मंदिरात भव्य यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यज्ञानंतर बागेश्वर धामचे महाराज म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे.  बागेश्वर बाबांच्या भक्तांच्या संख्या खूप मोठी आहे.

दरम्यान, अंनिसंनं बाबांच्या चमत्कारांवर बोट ठेवल्यानं त्यांचे भक्त चांगलेच संतापलेत. तर अंनिसचे कार्यकर्तेही इरेला पेटलेत. त्यामुळे या वादाच्या पुढील अंकात आता काय घडतं हे पाहाव लागेल.