मुंबई : दुधाच्या दराबाबत आमदार बच्चु कडु यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. दुधाच्या दराबाबात विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्यासोबत बच्चु कडू आणि दुध उत्पादक शेतकरी यांच्यात बैठक झाली. खाजगी दुधाच्या दराबाबत धोरण ठरवणे, दुधामधील फॅटनुसार दर निश्चित करणे, खाजगी दूध डेअरीवर भरारी पथकांची नियुक्ती, पशु खाद्य या विविध विषयांवर लवकरच ठोस निर्णय घेण्याचं आश्वासन महादेव जानकर यांनी बैठकीत दिलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी दूधाचं आंदोलन 15 दिवस पुढे ढकललं असल्याचं आमदार बच्चु कडू यांनी सांगितलं आहे
राज्यभर दुध दराबाबत यशस्वी आंदोलन केल्यानंतर आज बच्चु कडू राज्याचा कारभार जेथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर आंदोलन करणार होते.