मुंबई : वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा केल्याचा आरोप काँग्रेसचे वरीष्ठ नेते बाबा सिद्दीकींवर करण्यात आलाय. याच प्रकरणाची काही दिवसांपूर्वीच इडीने म्हणते अंमलबजवाणी संचालनालयने बाबा सिद्दीकी आणि त्यांचा सहकारी बिल्डर मकबूल कुरेशी यांच्या पाच कार्यालयांवर छापे मारले होते.
यातून काही महत्त्वाची कागदपत्रं ईडीच्या हाती लागली असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती इडीच्या अधिका-यांनी दिलीये. आज सकाळी १० वाजता बाबा सिद्दीकी यांना इडीने चौकशी करता बोलावले होते त्यानुसार बाबा सिद्दीकी यांची चौकशी इडीचे अधिकारी करताहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत एखाद्या भूखंडाचा विकास करायचा असेल, तर त्या भूखंडाचा काही भाग झोपडपट्टीधारकांसाठी सोडून द्यावा लागतो. मात्र, हे करताना सिद्दिकी आणि मकबूल कुरेशी यानं संगनमतानं बनावट कागदपत्रे बनविल्याचा आणि त्या माध्यमातून सुमारे १०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप करण्यात आलाय.
या प्रकल्पांमध्ये बोगस लाभधारक असल्याचा आरोप सिद्दीकींवर होतोय. मकबूल यांच्याकडून बाबा सिद्दिकी यांच्या कंपनीला पैसे गेल्याची कागदपत्रे ईडीला मिळालीयेत अशी माहिती मिळतेय. या या सगळ्या प्रकरणामुळे बाबा चांगलेच अडचणीत आलेत.
- शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणे
- बनावट दस्तावेज तयार करणे
- खोटी माहिती सादर करणे
- बोगस कंपण्या स्थापन करणे
- बनावट बिलं बनवणे
- अधिकाराचा गैरवापर करणे
- काळा पैसा परदेशात पाठवणे