दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करताय, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

वाहनकर्ज आतापर्यंतच्या निचांकावर आलं असून बँकांनी अनेक ऑफर्सही दिल्या आहेत

Updated: Oct 19, 2021, 10:28 PM IST
दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करताय, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी title=

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये होणारी वाढ काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीए. आतापर्यंतचे उच्चांकी आकडे गाठणाऱ्या या दरवाढीने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. या दरवाढीचे थेट परिणाम इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये दिसू लागले आहेत. 

पण महागाईनं सर्वसामान्य पिचले असताना एक चांगली बातमी आहे. या दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. वाहनकर्ज आतापर्यंतच्या निचांकावर आलं आहे. 6 पूर्णांक 85 टक्क्यांपर्यंत व्याजदर खाली आले असून अनेक बँकांनी प्रोसेसिंग फीदेखील माफ केली आहे. विशेष म्हणजे बहुतांश बँका ऑन रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देत आहेत. काही बँकांनी तर ग्राहकांना 10 टक्के कर्ज देण्याचीही तयारी केली आहे. ज्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर चांगला आहे, त्यांना अधिक फायदे मिळणार आहेत. 

सर्वात स्वस्त वाहनकर्ज               

बँक ऑफ इंडिया - 6.85%

बँक ऑफ बडोदा - 7%

पंजाब नॅशनल बँक - 7.15%

स्टेट बँक ऑफ इंडिया - 7.25%

HDFC बँक - 7.5%

ICICI बँक - 7.5%

वाहन कर्ज आतापर्यंतच्या निचांकावर आहे. गृह कर्जाच्या आसपास बँका वाहन कर्ज देत आहे. पाच वर्षांसाठी 5 लाखांपर्यंतच्या वाहन कर्जावर 9 हजार 866 रुपये इतका EMI आहे.