मुंबई : आजपासून विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आणि अंतिम आठवडा सुरू होत आहे. आज विधीमंडळात कायदा सुव्यवस्था यावर विरोधक आक्रमक होणार आहेत. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का? याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाकडे सभागृहाचं लक्ष असणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम प्रस्ताव यावर स्वाक्षरी करून विधीमंडळाकडे पाठवतात का याकडे सभागृहाच लक्ष आहे. काल महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. आता राज्यपाल यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
भाजपाचे बारा निलंबित आमदारकी मागे घेणे त्याचवेळी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणे यासाठी महाविकास आघाडी नेते आणि भाजपा नेते यांच्यात राजकीय चर्चा सुरू झाल्यात यात काय तोडगा निघतो याकड लक्ष आहे.
विधानसभेत आज अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था , कोरोना काळात भ्रष्टाचार, महिला अत्याचार यावर गंभीर आरोप सत्ताधारीवर करणार आहेत.
विधान परिषदेत अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक यावर लक्षवेधी - तसच अंतिम आठवडा प्रस्ताव राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न गुन्हेगारी , माजी मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव यासह अनेक मु्ददे विरोधी पक्ष नेते विधान परिषदचे प्रवीण दरेकर बोलणार आहेत.