भाजपा मुंबई अध्यक्ष लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस

मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 

Updated: Oct 18, 2019, 09:42 AM IST
भाजपा मुंबई अध्यक्ष लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. मुंबादेवीतील शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचार सभेत लोढा यांनी एका धर्माविषयी केलेल्या विधानमुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 

लोढा यांच्याबरोबरच उमेदवार पांडुरंग सकपाळ, या सभेसाठी परवानगी घेणारे अभिजित गुरव यांनाही नोटीस बजावली आहे. विशिष्ट धर्माविषयी लोढा यांनी संबंधित वक्तव्य केले आहे का अशी विचारणा निवडणूक आयोगाने केली आहे. कोणत्याही धर्माविषयी द्वेष पसरवणारे विधान करणे हे आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याबाबत या तिघांकडून निवडणूक आयोगाने खुलासा मागवला आहे. त्यामुळे आता हे उमेदवार काय खुलासा देणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.