मुंबई : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज बऱ्याच वेळ कोर्टात सुनावणी सुरु होती. NCB च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्हाला माहिती मिळाली की, काही ग्रुप आमली पदार्थ स्वत: जवळ ठेवणार आहेत आणि त्याचे सेवन करणार आहे
आर्यनचे वकिल काय म्हणाले...
सतिश मानेशिंदे सह अमित देसाई हे वकिल आर्यनची बाजू कोर्टासमोर मांडत होते. ही संपूर्ण घटना २ ऑक्टोबरपासून सुरू होते. जेव्हा आर्यन खानला प्रतिक गाबा नावाच्या व्यक्तीने निमंत्रण देऊन पार्टीला बोलावले. ज्याने आमंत्रित केले तो या केसमध्ये अटक नाही. मात्र बोटीवर चढण्यापूर्वीच NCB च्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. NCB ला माहिती मिळाली होती. त्या आधारे अधिकारी आशिष रंजन यांनी ही कारवाई केली.आर्यनवर ड्रग्जचं सेवन करणे आणि विकने असा आरोप आहे.
एनसीबीचा आर्यनवरील आरोप चुकीचा
या घटननंतर एनसीबीने ६ च्या सुमारास तपासाला सुरूवात केली. तपासात काही जणांकडून ड्रग्ज जप्त केले. पंचनाम्यात आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंटकडे कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले. जर इन्फॉर्मेशन मिळाली होती तरी आर्यन कडे कोणतेही ड्रग्ज मिळाले , विकले नाही आणि वापर केला नाही. स्वतः जवळ ठेवणे , वापर करणे , किंवा विकणे असे काहीच सापडले नाही.
एन सी बी कडे जी माहीत मिळाली ती चुकीची आहे. आर्यन खान याला ह्या केस मध्ये ढकलले आहे , आर्यनकडे काहीच मिळाले नाही, त्याने नाही विकले नाही सेवन केले , मात्र ज्या आरोपींना अटक केली त्यांना ह्याच केसमध्ये टाकून त्यांचा सहभाग दाखवण्यात आले.
आजची कोर्टाची सुनावणी संपली
आर्यनच्या बेल वर उद्या सुनावणी होणार आहे. उद्या 12 वाजता सुनावणी होणार असून एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवतील. उद्या 5 वाजे पर्यंत जर निर्णय आला नाही तर पुढील 5 दिवस कोर्ट बंद आहे.
एन सी बीचे अधिकारी अनिल सिंग म्हणाले...
सुनावणी पुन्हा सुरू झाल्यानंतर अनिल सिंग एन सी बी कडून बोलत होते. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक हे ड्रग्जच्या आधीन होत आहे , हा एका दुसऱ्याच प्रश्न नसून काही गॅंग यात काम करत आहेत. कोणीतरी बोलावले म्हणजे का बोलावले ? त्याचे इनव्हाईटशन कोठे आहे ?
जामीन दिल्यास ते पुराव्या बाबत छेडछाड करू शकतील. आर्यन खान आणि इतरांकडून जे व्हॉट्सऍप संभाषण प्राप्त केले त्यानुसार ह्याचे परदेशी पेडलर बरोबर संबंध असावे त्याची चौकशी सुरु आहे. परराष्ट्र मंत्रालयाला आम्ही विनंती केली आहे की जे परदेशी नागरिक पकडले त्यांची चौकशी व्हावी.