लोकलमध्ये अश्लील चाळे करणारा जेरबंद

दिव्यागांच्या डब्याच्या जाळीतून अश्लील हरकत करणाऱ्या व्यक्तीला जी.आर पी ने अटक केली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 23, 2017, 01:23 PM IST
लोकलमध्ये अश्लील चाळे करणारा जेरबंद title=

मुंबई : दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सी एस एम टी रेल्वे स्टेशन इथून बेलापूर ला जाणाऱ्या लोकल मध्ये महिला डब्यालगत असणाऱ्या दिव्यागांच्या डब्याच्या जाळीतून अश्लील हरकत करणाऱ्या व्यक्तीला जी.आर पी ने अटक केली आहे.

सकाळी १० वाजता ही लोकल बेलापूरच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी सी.एस.एम. टी आणि मस्जिद स्थानकादरम्यान या व्यक्तीने अश्लील चाळे केल्याचे उघडकिस आले होते.सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेने दिलेला व्हिडिओ या आधारे त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

कृपा पटेल असे या व्यक्तीच नाव आहे हा फुटपाथ वर मस्जिद बंदर इथे राहतो मजुरीच काम करत असल्याचे जी आर पी. सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले.