मुंबई : स्वात्तंत्र्यानंतर देशातील एक महत्त्वाची घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोखरण-२ ला येत्या ११ मे रोजी २० वर्षे पुर्ण होत आहेत. ११ मे १९९८ ला भारताने पोखरण इथे तीन यशस्वी अणु चाचण्या घेत जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी १३ मे ला पुन्हा दोन अणु चाचण्या घेण्यात आल्या. या यशस्वी चाचण्यांच्या घटनाक्रमात प्रत्यक्ष सहभाग, महत्त्वाची भूमिका बजावणा-या डॉ अनिल काकोडकर यांच्या पोखरण-२ बाबतचा अनुभव कथन करणारा कार्यक्रम झी २४ तासने आयोजित केला आहे.
उद्या म्हणजे सोमवारी अणु ' शक्ती' प्रकटली , हा कार्यक्रम विलेपार्ले पूर्व इथे संध्याकाळी ६ वाजता पीटीवीए इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंटच्या केशवराव घैसास सभागृह इथे होत आहे. या निमित्ताने पोखरण-२ बद्दल प्रश्न विचारायची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे. तेव्हा पोखरण-२ ला २० वर्षे पूर्ण होत असतांना पोखरण अणु चाचण्यांबद्दल, त्यानंतर भारताने केलेल्या अणु संशोधन आणि अणु ऊर्जा क्षेत्रातील वाटचालीबद्दल डॉ अनिल काकोडकर काय भाष्य करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.