मुंबई : कालपर्यंत ठाकरे गटासोबत असणाऱ्या ईशान्य मुंबई महिला संघटक संध्या वढावकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महापालिकेतील नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पुढाकाराने संध्या वढावकर शिंदे गटात शामील झाल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या संध्या वढावकर या शिवसेनेच्या जेष्ठ महिला कार्यकर्त्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका लागला आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तशी ताकद कमी आहे. पण तरी देखील शिंदे गटात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या पुढील आव्हान वाढणार आहे.
मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्रातील विविध भागात जावून दौरा करत आहेत. यावेळी अनेक जण त्यांना आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत उतरु शकते. त्यामुळे ठाकरे गटाला येथे मोठा फटका बसू शकतो.