अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.

Updated: Sep 23, 2017, 02:30 PM IST
अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी  title=

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आलीय. आपल्याला आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय.

हा फोन पाकिस्तानातील कराची शहरातून आल्याचा दावाही त्यांनी केलाय. भाजप नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात तक्रार मागे घेण्यासाठी हा फोन आल्याचं दमानिया यांनी म्हटलंय. 

या संदर्भात दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलीय. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त तपास करत आहेत.