मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने रात्री उशिरा अटक केली. अनिल देशमुखांच्या अटकेनंतर दुसरा नंबर अनिल परब यांचा नंबर असं ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. या ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. महाविकासआघाडी सरकारच्या आणखी एका नेत्याच्या नावाचा उल्लेख किरीट सोमय्यांनी उल्लेख केला आहे. (BIG BREAKING! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक)
At last Home Minister #AnilDeshmukh is arrested by ED. More than 100 Crores Non Transparent Transactions. Cash Trail
Next will be #AnilParab
अखेर ठाकरे सरकारचे गृहमंत्री #अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली.100 कोटींहून अधिक गैर-पारदर्शक व्यवहार.
अनिल देशमुख नंतर अनिल परब pic.twitter.com/SN2Tek9Q7n
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 1, 2021
अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असा धक्कादायक दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्या यांनी ट्वीटसह व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं. देशमुखांच्या अटकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे टेन्शन आता वाढणार आहे. दरमहा 100 कोटींची वसुली येत होती त्यातील पवार यांच्याकडे किती पैसे पोहचते व्हायचे आणि ठाकरेंकडे किती जायचे, याचे उत्तर आता द्यावे लागणार, असं सोमय्या म्हणाले आहेत. (Anil Deshmukh Arrested : अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आमदार नितेश राणेंच ट्विट)
अनिल देशमुख - शुभ दिवाळी
अनिल परब - ख्रिसमस
विशेष धन्यवाद नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेनंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचे सूचक आणि उपरोधिक ट्विट केलं आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे