Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान, ऋतुजा लटके यांच्यासमोर या उमेदवारांचं आव्हान

रमेश लटके यांच्या निधनामुळे (Andheri By Election 2022) त्यांच्या पत्नी ऋुतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.  

संजय पाटील | Updated: Nov 2, 2022, 08:19 PM IST
Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान, ऋतुजा लटके यांच्यासमोर या उमेदवारांचं आव्हान title=

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election 2022) गुरुवारी 3 नोव्हेंबरला मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. दिवगंत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होतेय. रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋुतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुरजी पटेल यांनी वरिष्ठ नेत्याच्या आदेशानंतर उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. मात्र त्यानंतरही लटके यांच्यासमोर 6 अपक्ष उमेदवारांचं आव्हान असणार आहे. (andheri east assembly by election voting will be held on 3 November 2022 rutuja latke)

7 उमेदवार रिंगणात 

ऋतुजा रमेश लटके – शिवसेना (ठाकरे गट)
बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स)
मनोजकुमार नायक – राईट टू रिकॉल पार्टी
मिलिंद कांबळे – अपक्ष
राजेश त्रिपाठी – अपक्ष 
निना खेडेकर – अपक्ष
फरहान सय्यद – अपक्ष

एकूण किती मतदार?

मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2 लाख 71 हजार 502 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 46 हजार 685 पुरुष आणि 1 लाख 24 हजार 816 महिला मतदारांचा समावेश आहे.

एकूण 256 केंद्रावर या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. मतदानप्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. या मतदानासाठी निवडणूक आयोगाची पूर्ण तयारी झाली आहे. तसेच मतदान केंद्रात आणि आसपासच्या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे.

संचारबंदी लागू 

दरम्यान या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1-3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच निकालाच्या दिवशी मतदारसंघात कोरडा दिवस (Dry Day) असणार आहे.  

सार्वजनिक सुट्टी 

या पोटनिवडणुकीसाठी काही दिवसांआधीच निवडणुकीच्या दिवशी मतदारसंघातील जनतेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

निकाल कधी?

तसेच या पोटनिवडणुकीचा निकाल हा 6 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.