Pocket Money म्हणून अनंत अंबानींना किती पैसे मिळायचे हे पाहून पायाखालची जमीन सरकेल

Anant Ambani Pocket Money: अनंत अंबानींनी आपलं शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. आजोबांच्या नावाने असलेल्या या शाळेची मालकी अनंत यांचे वडील मुकेश अंबानी यांच्याकडेच आहे हे विशेष. निता अंबानींनी अनंत अंबानींना मिळणाऱ्या पॉकेट मनीबद्दल केलेला खुलासा.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 20, 2023, 02:20 PM IST
Pocket Money म्हणून अनंत अंबानींना किती पैसे मिळायचे हे पाहून पायाखालची जमीन सरकेल title=
निता अंबानी यांनीच दिलेली यासंदर्भातील माहिती

Anant Ambani Pocket Money: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींचे (Mukesh Ambani) धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) हे अनेकदा चर्चेत असतात. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक कंपन्यांचे ते सध्या निर्देशक आहेत. लवकरच अनंत हे त्यांची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नबंधनात अडकरणार आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्यामध्ये अनंत अंबानींच्या कपड्यांपासून ते आलिशान घड्याळापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा बातम्यांपासून ते सोशल मीडियावरही होती.  मात्र सध्या आलिशान गाड्या आणि घड्याळांमुळे चर्चेत असणाऱ्या अनंत अंबानींना आठवडाभराच्या खर्चासाठी (पॉकेट मनी) शालेय वयामध्ये किती रुपये मिळायचे ठाऊक आहे का?

किती रुपये पॉकेट मनी म्हणून मिळायचे?

अनंत अंबानी हे धिरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये होते. म्हणजेच त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेल्या शाळेतच ते शिकले. या शाळेची मालकी मुकेश अंबानींकडे म्हणजेच अनंत यांच्या वडिलांकडे आहे. 'आयडीव्हा'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निता अंबानींनी त्यांची मुलं आकाश, इशा आणि अनंत अबांनींना आठवड्याला किती रुपये पॉकेट मनी दिला जायचा याची माहिती दिली होती. तुम्हाला नक्कीच ही रक्कम वाचून आश्चर्य वाटेल, कदाचित तुमच्या पाया खालची जमीनही सरकेल पण अनंत अंबानींना शालेय जीवनामध्ये केवळ 5 रुपये पॉकेट मनी म्हणून मिळायचे. निता अंबानींनीच यासंदर्भातील माहिती देताना, मुलांना पैशांची किंमत कळावी या हेतूने केवळ 5 रुपये दर आठवड्यांना त्यांना दिले जायचे असं म्हटलं होतं.

अनंत अंबानींची उडवायचे खिल्ली

याच मुलाखतीमध्ये निता अंबानींनी एकदा त्यांच्या धाकट्या मुलाला म्हणजेच अनंत अंबानींची शाळेच्या कॅन्टीनमध्ये खिल्लीही उडवण्यात आली होती. केवळ 5 रुपये खर्चाला मिळत असल्याच्या मुद्द्यावरुन अनंत अंबानींना लक्ष्य केल्याचं निता अंबानी म्हणाल्या होत्या. "तू अंबानी आहेस की भिकारी,"असंही त्याला म्हटलं जायचं असंही त्यांनी सांगितलं. मुलाकडून त्याला मिळणाऱ्या 5 रुपयांसाठी होणारी वक्तव्य ऐकून निता आणि मुकेश अंबानी या गोष्टी हसण्यावारी न्यायचे.

सध्या करतात अनेक कंपन्यांचं नेतृत्व

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मलेले ईशा, आकाश आणि अनंत अंबानी हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. अनंत अंबानींनी त्यांचं शिक्षण ब्राऊन विद्यापीठातून पूर्ण केलं होतं. त्यांनी सध्या रिलायन्सच्या न्यू एनर्जी क्षेत्रातील उद्योगांची धुरा संभाळतात. ते सध्या रिलायन्स झिरो टू सी आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जी कंपन्यांचं नेतृत्व करतात. सध्या अनंत अंबानींची एकूण संपत्ती 40 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.