मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच

Anand Mahindra New Post: आनंद महिंद्रा यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला हजारो लाइक्स आले आहेत. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2024, 04:33 PM IST
मुंबईतल्या पावसापासून बचाव कसा कराल? आनंद महिंद्रांनी सांगितला भन्नाट जुगाड, Video पाहाच  title=
Anand Mahindra New viral post he share a video which if useful in Mumbai Rain

Anand Mahindra New Post: मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात गेल्या काहि दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. Mumbai Rain हमखास चर्चेचा विषय ठरतो. मुंबईत थोडासा जरी पाऊस पडला तरी मुंबई पूर्णपणे ठप्प होते. मुंबईतील सखल भागात पाणी साचून वाहतूक विस्कळीत होते. याच पार्श्वभूमीवर बिझनेसमन आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. पावसापासून बचाव करण्यासाठीची हा जुगाड त्यांनी शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो वेगाने व्हायरल होत आहे. 

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. ते सतत सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतात. त्यांची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे. ज्यात पावसाळ्यात छत्री कशी वापरावी याबाबत त्यांनी भन्नाट आयडिया सांगितली आहे. आनंद महिंद्रा यांनीही मुंबईच्या पावसापासून बचाव होण्यासाठी ही आयडिया बेस्ट असल्याचे म्हटलं आहे. 

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ फक्त 14 सेकंदाचा आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती हातात छत्री पकडण्यापेक्षा छत्रीचे हँडलमध्ये दोन हँगरचा वापर करुन पाठीवर छत्री टांगली आहे. त्यानंतर दोन्ही हातात सामान व बॅग घेऊन चालताना दिसत आहे. महिंद्रा यांनी या व्हिडिओ शेअर करत मुंबईच्या पावसासाठी ही भन्नाट आयडिया असल्याचे म्हटलं आहे. तसंच, कॅप्शनही त्यांनी भन्नाट लिहलं आहे. 

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर, कॅप्शनमध्ये लिहलंय की, आखेर मान्सून मुंबईत आला आहे. हा पण आमच्यासाठी हा मान्सून खूपच कमी आहे. पण आता वेळ आली आहे की या पावसापासून बचाव करण्यासाठी एक फुलप्रुफ योजना बनवावी. अशावेळी परिधान करता येतील अशा छत्र्यांचा वापर करावा लागेल. अशा छत्र्यांबद्दल आता विचार करावा लागेल. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

पावसात नवीन पद्धतीने छत्री वापरण्याची ही आयडिया सांगणारा हा व्हिडिओ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 22 जून रोजी शेअर केलेल्या या पोस्टला आत्तापर्यंत 4 लाखापर्यंत अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, हजारो लोकांनी यावर लाइक केले आहे. युजर्स देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत. ट्विटरवर आनंद महिंद्रा यांची मोठे फॅन फॉलोइंग आहेत. आणि त्यांचे फॉलोअर्सची संख्या ही 11.2 मिलियनवर पोहोचली आहे. त्यांच्या पोस्टवरही अनेक कमेंट आणि लाइक्स येत असतात.