'यापुढे धडे सुरु होतील' म्हणत अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला

राज्यसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. भाजपने सहाव्या जागेवर बाजी मारली आहे.

Updated: Jun 11, 2022, 05:14 PM IST
'यापुढे धडे सुरु होतील' म्हणत अमृता फडणवीस यांचा शिवसेनेला टोला title=

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajaysabha Election 2022) निकालात महाविकासआघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवाराला (Shiv Sena Candidate loses) पराभवाचा सामना करावा लागला आहे. संख्याबळ नसतानाही भाजपने (BJP Win) सहावी जागा पटकावली आहे. अपक्ष आमदारांना (Independent MLA) आपल्या बाजुने वळवण्यात देवेंद्र फडणवीस यांना मोठं यश आलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या यशानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. सोबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक ही केलं आहे. 'देवेंद्र अकेला नही..कायनात उसके साथ है. अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. 

राज्यसभा निवडणुकीत सत्याच्या बाजूने निकाल लागला, यापुढे शिवसेनेला धडे सुरू होतील असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे. 

महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकल्यानंतर, महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हा "विश्वसनीय" विजय असल्याचे सांगितले आणि त्याचे श्रेय काळजीपूर्वक नियोजन तसेच सांघिक कार्याला दिले. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी भाजपचे धनंजय महाडिक यांना त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळाल्याचे सांगत रिंगणातील उमेदवारांपैकी एक असलेले शिवसेनेचे संजय राऊत यांचाही समाचार घेतला.

राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 रिक्त जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले होते.

महाराष्ट्रातील सहा जागांपैकी भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. महाविकासआघाडी कडून शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.