मुंबई : Devendra Fadnavis on Election : राज्यसभेची सहावी जागा जिंकल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. राज्यसभा ही छोटी लढाई अजून मोठी लढाई बाकी आहे. 2024ला लोकसभा येईल तेव्हा लोकसभा जिंकू नंतर विधान सभा स्वबळावर जिंकू आणि मुंबई महानरपालिकाही आपण जिंकू, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला. आमच्या पाठीत खंजीर खूपसून सरकार स्थापन केले आहे, असे ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीत काही मतांवर आक्षेप घेतल्याने निवडणूक निकालाला वेळ लागला. आमच्या तक्रारीमुळे नाही, यांच्या तक्रारीमुळे निकालाला वेळ लागला. आणि मग यांनी पुन्हा जुनी टेप चालू केली. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. एक मत बाद झालं नसते. नवाब मलिक यांनी मतदान केलं असतं तरी तरीही आम्हीच जिंकलो असतो. सत्ताधारी आमदारांनीमध्ये अस्वस्थता आहे, असे फडणवीस म्हणाले.
विधानपरिषद निवडणूक आम्ही सोपी मानत नाही. कुठलीही निवडणूक सोपी नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ही एके काळी असं बोललं जायचं की ते माणस जोडतात. आता आमच्या बद्दल बोललं जात आहे. आमचे आहेत सर्वांशी चांगले सबंध आहेत. महाविकास आघाडीने आम्हाला तिसरा उमेदवार मागे घेण्याची ऑफर दिली होती. पण राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पक्ष म्हणून आमच्याकडे जास्त मत होती, असे ते म्हणाले.