VIDEO : अमृता फडणवीसांचा महिला दिनानिमित्त मोलाचा सल्ला

अमृता फडणवीस यांनी शेअर केला व्हिडिओ

Updated: Mar 8, 2021, 11:13 AM IST
VIDEO : अमृता फडणवीसांचा महिला दिनानिमित्त मोलाचा सल्ला  title=

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कायमच आपल्या कामांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी आपल्या गाण्याचा छंद खूप चांगल्याप्रकारे जोपासला आहे. ८ मार्च दिवशी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्यांनी एक खास (Amruta Fadnavis Shared Video on Wome's Day) व्हिडिओ शेअर केला आहे. 

अमृता फडणवीस यांनी काय दिला सल्ला? 

‘दरवर्षीच महिला दिन साजरा केला जातो. या दिवसाशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्त्रीविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते आणि यावर्षीदेखील असं होणार. मात्र मला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. महाराष्ट्रात आज स्त्री सुरक्षितता, स्त्री सशक्तीकरण आणि स्त्री प्रगती याबाबतीत खूप काही बोललं जातं आहे. पण एकीकडे असं होत असताना दुसरीकडे मात्र स्त्रीवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत. स्त्रियांवर होणारे बलात्कार, घाण प्रकारे होणारी ट्रोलिंग, स्त्रियांच्या होत असलेल्या आत्महत्त्या हे प्रचंड वाढलं आहे,’ असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.

पुढे त्या म्हणाल्या, ‘मला हेच सांगायचं आहे की, स्त्रियांच्याबाबतीत तुम्ही जे बोलता, त्यांच्याशी कसं वागता याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता पुरोगामी महाराष्ट्रात काही बदल घडवून आणायचा असेल, तर तो तुम्हीच घडवून आणू शकता. स्त्रीला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुम्ही तिची साथ द्या, त्यांना मागे ओढू नका… तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा… ,’ असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

आज येणार नवं गाणं... 

'केवळ जीवन जगते आहे असे नाही, तर स्वातंत्र्याने परिपूर्ण असे स्त्रीजीवनाचे अस्तित्त्व असले पाहिजे- या विषयावर माझे काही विचार मांडते आणि याच बाबत स्त्री शक्ति वर आधारित डॉ. रख्माबाई चित्रपटाचे माझे गीत नक्की ऐका ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी,' अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.