Amruta Fadanvis new Song : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

अमृता फडणवीस यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवं गाणं लॉन्च केलं आहे

Updated: Nov 19, 2021, 08:01 PM IST
Amruta Fadanvis new Song : अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. कधी गाणं तर कधी विविध विषयांवर ट्विट करत त्या नेहमची चर्चेत असतात.

आज अमृता फडणवीस यांनी आपल्या फेसबूक पेजवर नवं गाणं (New Song Launch) लॉन्च केलं आहे. सध्याच्या तापलेल्या राजकीय वातवरणात काही हलके क्षण अनुभवुया असं म्हणत अमृता फडणवीस यांनी हे गाणं लॉन्च केलं आहे. 

इंटरनेट सेन्सेशन ठरलेली श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेलं 'मानिके मागे हिते' या गाण्यावर आधारित हे गाणं असून ‘मन ही मन तुझे चाहा…’ अशी या गाण्याची सुरुवात आहे.

याआधी अमृती फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या गाण्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, आओ कुछ तुफानी करते है, कल शाम... मी पुन्हा येत आहे !!! असं म्हटलं होतं.