दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
- सरकारमध्ये राहून टीका करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर अमित शहा यांची नाराजी
- उद्धव ठाकरेंबरोबर झालेल्या भेटीत व्यक्त केली नाराजी
- शिवसेनेने स्वत:ची भूमिका बदलावी अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा
- अमित शहांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर रोखठोक भूमिका
- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसनेच्या पाठिंब्याबाबतही झाली मातोश्रीवर चर्चा
- अमित शहा यांच्या भूमिकेवर शिवसनेने आपली भूमिका जाहीर केली नाही
- उद्या शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे भूमिका जाहीर करण्याची शक्यता