RSS च्या कार्यक्रमात प्रणवदांच्या उपस्थितीवर अमित शाह म्हणतात...

 

Updated: Jun 7, 2018, 11:05 AM IST

 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. मुंबई दौर्‍यादरम्यान अमित शहांनी झी चोवीस तासला खास मुलाखती दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना अमित शहा यांनी प्रणव मुखर्जींच्या संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याबाबतही आपलं मत मांडले आहे. 

काय म्हणाले अमित शहा ? 

'प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जात असतील तर त्यामध्ये हरकत घेण्यसारखे काय आहे?' असा सवाल अमित शहांनी  झी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केले आहे.  प्रणब मुखर्जी हे संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे पहिले नेते नाही. पहा कोणकोणत्या कॉंग्रेस नेत्यांनी लावली आहे संघाच्या कार्यक्रमाला हजेरी? 

असा असेल प्रणवदांचा दौरा 

नागपूर विमानतळावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं.. आज दिवसभर त्यांचे कुठलेही नियोजित कार्यक्रम नसून राजभवनातच ते काही लोकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यात बंगाली असोसिएशनचा समावेश आहे. दुपारी भोजनासाठी ते रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात येणार आहेत. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत आणि तृतीय वर्ष वर्गाच्या प्रशिक्षणार्थींसोबत भोजन घेणार आहेत. दरम्यान, भागवत यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आणि प्रशिक्षणार्थींच्या संचलनाची रंगीत तालीमही पाहिली.