अशा राख्या भावाला अजिबात बांधू नका; मानलं जातं अशुभ

22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेला साजरा केला जातो

Updated: Aug 21, 2021, 03:40 PM IST
अशा राख्या भावाला अजिबात बांधू नका; मानलं जातं अशुभ title=

मुंबई : 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी बहिणी भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि सुख -समृद्धीची कामना करतात. मात्र कधीकधी नकळत अशा राख्या येतात ज्या शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे राखीची निवड अत्यंत काळजीपूर्वक केली पाहिजे.

यावेळी बाजारात विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. विशेषतः चीनमधून येणाऱ्या राखी सुंदर दिसतात. पण त्या भारतीय सभ्यतेनुसार बनवल्या जात नाहीत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी अशा विशिष्ट प्रकारच्या राख्या बांधणं टाळावं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, अशा विशिष्ट प्रकारच्या राख्या विकत घेऊ नये.

राखी खरेदी करताना किंवा बांधताना काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नकळत बाजारातून राख्या आणताना ती तुटू शकते. अशावेळी आपण ती राखी पुन्हा जोडतो. मात्र तुटलेली कधीही बांधू नये.

बाहेरून येणाऱ्या प्लास्टिकच्या राख्या वापरू नका. कारण प्लास्टिक हा केतूचा पदार्थ मानला जातो आणि त्यामुळे अपयश येत असल्याचं मानलं जातं. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राख्या घरी आणणं टाळा. 

राखी अशी नसावी ज्यात कोणतीही तीक्ष्ण धार किंवा कोणत्याही प्रकारचं शस्त्र बनवलेलं असावं. त्याचप्रमाणे देवाच्या प्रतिमा असलेल्या राख्याही बनवल्या जातात. अशा राख्याही शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे मुलींनी या प्रकारची राखी खरेदी करणं टाळावं.

काही राखींमध्ये खूप वर्क केलेलं असतं. या वर्कमध्ये लोह्याचं काम केलेल्या राख्या खरेदी करणं देखील टाळा. या व्यतिरिक्त रंगांची काळजी घेणे महत्वाचे आहे, अशी राखी कधीही खरेदी करू नका ज्यात काळ्या रंगापासून कोणतीही रचना केली गेली आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात काळ्या रंगाचा वापर करणे अशुभ मानले जाते.