महाराष्ट्र बंद : मुंबईतील सर्व एसी लोकल रद्द

महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फे-या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 3, 2018, 01:16 PM IST
महाराष्ट्र बंद : मुंबईतील सर्व एसी लोकल रद्द title=

मुंबई : महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फे-या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळपासूनच महाराष्ट्र बंद आंदोलनाला ठिकठिकाणी सुरुवात झाली. मुंबईत देखील त्याचे मोठे पडसाद आता दिसू लागले आहेत. मुंबईच्या रेल्वे सेवेवर त्याच्या परिणाम दिसतोय. मुंबईत अनेक ठिकाणी रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेवर परिणाम

मध्य रेल्वेही आता विस्कळीत झाली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आंदोलक ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली आहे. विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनजवळ काही काळ रेल्वे अडवून ठेवण्यात आली होती.

हार्बर रेल्वे विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे. गोवंडी आणि जुईनगर येथे रेलरोको सुरु आहे.

मुंबई मेट्रोही बंद

घाटकोपर ते एअरपोर्ट रोड स्टेशनदरम्यान मुंबई मेट्रोच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही काळात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

वेस्टर्न रेल्वे विस्कळीत

वेस्टर्न रेल्वेवर ही महाराष्ट्र बंदचा परिणाम दिसत आहे. नालासोपारा स्थानकावर मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. काही काळ त्यांनी ही वाहतूक रोखून धरली होती.