बाबासाहेबांचं २५० ऐवजी ३५० फुटांचं स्मारक उभारणार - अजित पवारांची घोषणा

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही - अजित पवार

Updated: Jan 15, 2020, 03:57 PM IST
बाबासाहेबांचं २५० ऐवजी ३५० फुटांचं स्मारक उभारणार - अजित पवारांची घोषणा title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी महत्त्वाची घोषणा केलीय. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय कॅबिनेटमध्ये आल्यानंतर जवळपास ११०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आता या स्मारकाची उंची वाढवणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. डॉ. आंबेडकर स्मारकाची उंची वाढवणार असून आता २५० फुटांऐवजी ३५० फूटांचं भव्य स्मारक उभारणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. 

स्मारकाचा खर्च ३०० कोटींनी वाढणार असल्याचं सांगतानाच कांस्य धातू वापरून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाईल, असंही त्यांनी सांगितलंय.

महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीए हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल. निधीची कमतरता पडू देणार नाही, याची ग्वाही अर्थमंत्री म्हणून देतो. मुख्यमंत्र्यांनीही हीच ग्वाही दिली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. राहिलेल्या परवानग्या पुढच्या आठ दिवसांत मिळवणार, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिलीय.