विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवण्याची एमआयएमची इच्छा

एमआयएमने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Jul 14, 2019, 08:23 PM IST
विधानसभा निवडणुकीत शंभर जागा लढवण्याची एमआयएमची इच्छा title=

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने शंभर जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. याबाबतची मागणी एमआयएमकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे करण्यात आली आहे. जिथे एमआयएमचे प्राबल्य वाढले आणि त्यांना जिंकण्याची आशा वाटतेय अशा शंभर जागांची यादी एमआयएमने तयार केली आहे. या जागांची यादीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची लवकरच बैठक होणार असल्याचीही माहिती मिळतेय. 

वंचिंत बहुजन आघाडीमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच प्रस्थापितांना देखील वंचितने धक्का दिला होता. यानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचेही प्रयत्न सुरु केले आहेत.