मुंबई: पाठीमागील नऊ महिन्यापासून बंद असणारी चेंबूर ते वडाळा मोनो रेल एक सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे. म्हैसूर कॉलनी स्थानक इथे मोनो च्या डब्याला लागलेल्या आगी नंतर मोनो रेल बंद करण्यात आली होती. आता नऊ महिन्या नंतर ही सेवा सुरू होतेय. वडाळा ते सात रस्ता हा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.
दरम्यान, दुसरी बातमी आहे रेल्वेच्या मेगाब्लॉकसंबंधी. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आज (रविवार) घेण्यात येणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान सकाळी सव्वा आकरा ते सव्वा चार वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
अंधेरी रेल्वे पादचारी पूल पडल्याची घटना घडल्या नंतर सर्व पूलांच स्ट्रक्चरल ऑडिट व्ह्याव अशी मागणी झाली होती. ठाणे स्टेशनला पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पुलावर भेगा पडल्या आहेत. या भेगेतुन खालचा भाग स्पष्ट दिसतो इतकी मोठी ही भेग आहे.