Electric scooter battery Blast : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याचा अंत

आता एक अतिशय धक्कादायक बातमी वसईतून. वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. शब्बीर शाहनवाज अन्सारी, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. (Electric scooter battery explodes inVasai)

Updated: Oct 2, 2022, 11:29 AM IST
 Electric scooter battery Blast : इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याचा अंत title=
संग्रहित छाया

Electric scooter battery Blast : आता एक अतिशय धक्कादायक बातमी वसईतून. वसईत चार्जिंगसाठी लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात सात वर्षीय चिमुरड्याचा भाजून मृत्यू झाला. शब्बीर शाहनवाज अन्सारी, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. (Electric scooter battery explodes inVasai)

वसई पूर्वेकडील रामदास नगर इथे राहणाऱ्या शाहनवाज अन्सारी यांनी 23 सप्टेंबला रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी घराच्या हॉलमध्ये चार्ज करण्यासाठी ठेवली होती. मात्र पहाटे बॅटरीचा भीषण स्फोट झाला. 

त्यात हॉलमध्ये झोपलेले शाहनवाज यांचा सात वर्षाचा मुलगा शब्बीर आणि त्याची आई रुकसाना हे दोघे जखमी झाले. शब्बीर हा 70 ते 80 टक्के भाजल्याने त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यू झाला.