नवी दिल्ली : टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट आणि प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका कामरा ही आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कृतिका आणि करण कुंद्राच्या रिलेशनच्या चर्चा याआधी चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले.
तरीही फॅन्सना त्या दोघांना एकत्र बघायचे आहे. पण फॅन्सची ही इच्छा कधी पूर्ण होणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.
'इरा दुबे' चॅट शोमध्ये करण वाही सोबत कृतिका पोहोचली होती. त्यावेळी एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्राबद्दल तिला विचारण्यात आले. त्याला जीवे मारू इच्छिते असे कृतिकाने सांगितले.
चॅट शोमध्ये तिला करण जोहर, करण कुंद्रा आणि करण वाही अशी ३ नावे देण्यात आली. यामध्ये कोणाशी लग्न, कोणाशी अफेयर, कोणाला मारायला आवडेल असे तिला विचारण्यात आले.
करण कुंद्राला मारू इच्छिते, वाही सोबत अफेयर आणि करण जोहरसोबत लग्न करु इच्छिते असे तिने सांगितले.
करणची मुल रुही आणि यशची काळजी घेण्यासाठी तिला करणसोबत लग्न करायला आवडेल असे ती म्हणाली.
कृतिका कामरा आणि करण कुंद्रा २००९ मध्ये 'कितनी मोहब्बत है' मध्ये एकत्र दिसले होते. यानंतर दोघे एकत्र रियॅलिटी शो 'नच बलिये' मध्ये दिसले होते.