मुंबई : मुंबईतल्या गोरेगावमध्ये अभिनेता अजय देवगणची कार एकानं रस्त्यात रोखून धरली.. शेतकरी आंदोलनाशी संबंधीत या व्यक्तीनं सुमारे पंधरा मिनिटं कार रोखून धरली. शेतकरी आंदोलनाला समर्थन का नाही देत असा सवाल या व्यक्तीकडून करण्यात आला. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
मुंबईत बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची गाडी शेतकरी चळवळीशी संबंधित व्यक्तीने थांबवली. अजय देवगन शूटिंगसाठी फिल्मसिटीला जात असताना निहंगसिंग नावाच्या या व्यक्तीने त्याची कार थांबविली आणि शेतकरी चळवळीवर प्रश्न विचारु लागला.
मंगळवारी सकाळी मुंबईतील दिंडोशी परिसरातील ही घटना घडली. अजय देवगण आपल्या गाडीच्या आत बसलेला दिसत आहे, तर आरोपी राजदीप सिंह त्याला पंजाबचा शत्रू म्हणत आहेत. आरोपी व्यक्तीच्या म्हणण्यानुसार दिल्लीत बरेच दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत, पण अजय देवगण त्यांच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाहीत. फिल्मसिटी जवळच्या भागात सुमारे 15 ते 20 मिनिटे हा गोंधळ सुरूच होता. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे.
घटनास्थळावरून पोलिसांना तक्रार दिल्यानंतर अजय देवगणच्या गाडीला पोलिसांनी वाट मोकळी करुन दिली. पोलिसांनी गाडी अडवणाऱ्या व्यक्तीला अटक केली. आरोपी राजदीप सिंहच्या मित्राच्या म्हणण्यानुसार त्याचा जोडीदार फक्त शेतकरी प्रश्नांवर बोलण्यासाठी गेला होता.
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने आंदोलनाविषयी ट्वीट केले असता अजय देवगणची एन्ट्री झाली होती, त्यास उत्तर म्हणून अजय देवगणने ट्वीट करत म्हटलं होतं की, ही देशासाठी सर्वात वाईट घटना आहे. अक्षय कुमार, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अजय यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींनी अशीच ट्वीट केली होती, नंतर महाराष्ट्र सरकारनेही या सर्व ट्वीटची चौकशी करण्याची मागणी केली होती.