मुंबई : मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरसेवक परमेश्वर कदम यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत गैरमार्गाने अधिक संपत्ती मिळवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याविरोधात एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
२००७ ते २०१२ या नगरसेवक पदाच्या काळात भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली चौकशी करण्यात आली होती. चौकशीत १३ लाख ९ हजार इतकी म्हणजे ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत ६४ टक्के अधिक संपत्ती त्यांच्याकडे मिळाली.
परमेश्वर कदम घाटकोपर पूर्व येथील प्रभाग क्र १२८ चे नगरसेवक आहेत. मनसेच्या ज्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामध्ये परमेश्वर कदम यांचाही सहभाग आहे.