एसी लोकलमुळे रेल्वेला आर्थिक गारवा

एसी लोकलने केली भरघोस कमाई

Updated: Jan 3, 2018, 06:32 PM IST
एसी लोकलमुळे रेल्वेला आर्थिक गारवा title=

मुंबई : एसी लोकलने केली भरघोस कमाई

एसी लोकलला प्रचंड प्रतिसाद

नुकतीच मुंबईत एसी लोकल सुरू झाली. त्याची चांगली प्रसिद्धीही करण्यात आली. प्रवाशांनी त्याला प्रचंड प्रतिसादही दिलाय. दोनच दिवसात एसी लोकलने चार लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं आहे.

चांगलं उत्पन्न

पहिल्या दोन दिवसात रेल्वेला जवळपास ४,५०,००० रुपयांचं उत्पन्न मिळालय. दोन दिवसात बारा हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला. नियमित प्रवाशांची संख्या वाढत असून एसी लोकलला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आहे. 

वाढती मागणी

एसी लोकल मासिक पासधारकांच्यासुद्धा पसंतीला उतरली आहे. दोन दिवसात पासधारकांकडून रेल्वेला तब्बल पाऊणे दोन लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. सध्या पश्चिम रेल्वेकडून हा उपक्रम राबावला जातोय. पुढे त्याचा विस्तार इतरत्रही करण्याचा रेल्वेचा प्लॅन आहे.