पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक

 पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक

Updated: Jun 12, 2018, 10:18 PM IST
 पोलिसांकडून अभिनेता अरमान कोहलीला अटक title=

मुंबई : अभिनेता अरमान कोहली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांताक्रुज पोलिसांनी ही कारवाई केली असून लोणावळ्यातून त्याला पकडण्यात आलं. बुधवारी अरमानला न्यायालयात हजर करणार आहेत. कोहलीवर गर्लफ्रेंड निरू रंधवाला मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप आहे. अरमान कोहलीवर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात भारतीय कलमानुसार ३२३, ३२६, ५०४, ५०६ चा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दरम्यान, उद्या करणार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोहलीवर गर्लफ्रेंड निरु रंधावाला मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप आहे.

अभिनेता अरमान कोहलीने आपल्या मीनू रंधवा यांना मारहाण केली. त्यानंतर तिला कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  अरमानने रागाने तिला जोरदार मारहाण केली होती. याबाबत मीनूने रविवारी रात्री सांताक्रूज (पश्चिम) पोलीस स्टेशनमध्ये अरमान यांच्या विरोधात तक्रार दिली होती. आयपीसी कलम ३२६ नुसार पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात अरमानला ७ वर्षे शिक्षा सुनावली जाऊ शकते. रविवारी, पोलीस त्याच्या घरी चौकशीसाठी गेले होते, परंतु अरमान तेथे नव्हता.