Eknath Shinde Rebel: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड शमताना दिसत नाही. रोज नवे डावपेच समोर येत असल्याने राजकीय जाणकारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. बंडखोर आमदारांना काय कमी केलं होतं की त्यांनी खोटारडेपणा केला, अशी टीका केली आहे. त्यासोबत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेबाबत गौप्यस्फोट देखील केला आहे.
"20 मे ला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? असं विचारलं होतं. पण २० जूनला बंड झालंच.", असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर बंडखोरांनी आपल्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलंय.
"मला दिलवाले दुल्हनिया चित्रपटाचा डायलॉग आठवतो, हम शरिफ क्या हुए, पुरी दुनिया बदमाश हो गई! आहोत आपण दिलवाले . पण त्यांचा खोटारडेपणा आम्ही सहन करणार नाही. खोटारडेपणाची चिरफाड करण्यासाठी मी निघालोच आहे. तुम्ही पण रस्त्यावर उतरून प्रत्येक घराघरात जाऊन त्यांच्या खोटारडेपणाची चिरफाड केली पाहीजे.", असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.