सुशांतच्या एका चाहत्याने त्याच्या आठवणीत बनवला मेणाचा पुतळा

सुशांतच्या चाहत्याने त्याच्या आठवणीत बनवला मेणाचा पुतळा

Updated: Sep 18, 2020, 09:35 PM IST
सुशांतच्या एका चाहत्याने त्याच्या आठवणीत बनवला मेणाचा पुतळा title=

कोलकाता : पश्चिम बंगालच्या आसनसोलच्या राहणाऱ्या एका मूर्तिकाराने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आठवणीत मेणाचा पुतळा बनवला आहे. सुशांतच्या या मेणाच्या पुतळ्यात काळी पँट, पाढरा टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट सोबत पांढरे बुटं आणि हातात घड्याळ दिसत आहे. मूर्तिकार सुकांतो रॉय यांनी म्हटलं की, 'जर अभिनेतेच्या कुटुंबाला हा पुतळा हवा असेल तर मी त्यांना नवीन बनवून द्यायला तयार आहे.'

सुशांतच्या मृत्यूनंतर एक ऑनलाईन आंदोलन सुरु झालं. त्याचे फॅन्स आणि फॉलोअर्स सुशांतला न्याय देण्याची मागणी करत होते. त्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली होती. अखेर लोकांच्या मागणीनंतर सीबीआयकडे चौकशी सोपवण्यात आली. त्यानंतर लंडनच्या मॅडम तुसाद म्यूझियममध्ये देखील सुशांतच्या पुतळा ठेवण्याची मागणी होत आहे. यासाठी ऑनलाईन याचिका देखील साईन करण्यात येत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wax statue of #SushanSinghRajput at Asansol (West Bengal): Looks so real & alive. Brilliant

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ऑनलाईन याचिकेत जगभरातील सुशांतच्या फॅन्सला स्वाक्षऱ्या करण्यास सांगण्यात आलं आहे. यावर २ लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत 1 लाख 70 हजार लोकांनी यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.