मुंबई : मुंबई महापालिकेच्या मणीलाल सुंदरजी तामीळ शाळेची विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. बेपत्ता झालेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.
मणीलाल सुंदरजी तामीळ शाळेतून मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुलीचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणामुळे मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. या चिमुकलीची हत्या करण्यात आली की आणखी काही कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
शाळकरी मुलगी बेपत्ता आणि त्यानंतर मिळालेल्या मृतदेहानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार होणाऱ्या या घटानांमुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये, पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. याआधीदेखील नवी मुंबई, मुंबईत अशाप्रकारे मुले बेपत्ता झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहे.