पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या

पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.  

Updated: Oct 14, 2020, 09:04 AM IST
पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या  title=

मुंबई : पश्चिम रेल्वेवर १५ ऑक्टोबरपासून १९४ लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत. सध्या पश्चिम रेल्वे वर ५०६ लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यात १९४ फेऱ्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे एकूण ७०० फेऱ्या होणार आहेत. १९४ पैकी १० फेऱ्या या ए सी लोकलच्या असणार आहेत. लोकलमधील गर्दी कमी होण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 

कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली एसी लोकल सेवा १५ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून एकू ण १९४ लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. यामध्ये सामान्य लोकलसह वातानुकूलित लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलच्या महालक्ष्मी ते बोरीवली आणि बोरीवली ते चर्चगेट अशा दोन फेऱ्या धिम्या मार्गावर होतील. तर चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट अशा अप-डाऊन मार्गावर मिळून आठ जलद लोकल फेऱ्या होणार आहेत. 

सध्या पश्चिम रेल्वेवर ५०६ लोकल फेऱ्या होत होत्या. नवीन फेऱ्यांची भर पडणार असल्याचे एकूण फेऱ्यांची संख्या ७०० होणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेही फेऱ्या वाढवणार आहे. होणारी गर्दी पाहता उच्च न्यायालयाने फेऱ्यांची संख्या प्रत्येकी ७००पर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पश्चिम रेल्वेने नवीन फेऱ्यांची भर पाडताना मध्य रेल्वेनेही लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दरदिवशी ४५३ फेऱ्या मध्य रेल्वेवर होतात. या फेऱ्या आणखी ७०० पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

दरम्यान, डेक्कन क्वीनचा मावळच्या मध्यवर्ती  परिसरात कोणताच थांबा नसल्याने मुंबईसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या ट्रेनने प्रवास करण्यासाठी पुणे स्टेशन किंवा लोणावळा गाठावे लागते. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून या ट्रेनचा थांबा मावळ किंवा पिंपरी चिंचवड परिसरात करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.