मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी या भागात पाणीपुरवठा खंडीत

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत

Updated: Aug 2, 2022, 10:55 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी या भागात पाणीपुरवठा खंडीत title=

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई :  गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण मुंबई शहर व उपनगरात काही भागात पाणीकपात होणार आहे. तर काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे भांडुप संकुल येथील जुन्‍या महासंतुलन जलाशयापासून सुरु होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे व बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्‍याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 

भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्‍लोरिन इंजेक्‍शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

हे काम गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत संपूर्ण मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तर काही ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. 

पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रामध्ये पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येणार आहे.
भांडुप येथील गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर  - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

रमाबाई नगर १ आणि २ , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर -पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

साई हिल, टेंभीपाडा -  पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड- कमी दाबाने पाणीपुरवठा 

खिंडीपाडा, श्रीरामपाडा, राजारामवाडी - सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद 

रामनगर, तानाजीवाडी - सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद 

सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी व गावदेवी मार्ग - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील

रमाबाई आंबेडकर नगर, टेंभीपाडा, नरदास नगर, शिवाजी नगर, साई हिल, साई विहार - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

नरदास नगर, शिवाजी नगर - सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

कांजूर (पश्चिम), विक्रोळी (पश्चिम), सुर्यानगर, विक्रोळी स्थानक लगतचा परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

आरे रोड, मोरारजी नगर, गौतम नगर, जयभीम नगर, फिल्टर पाडा, पठाणवाडी - सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजता पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

कैलाश संकुल पंपिग स्टेशन येथून होणारा पुरवठा - वीर सावरकर मार्गालगतचा परिसर, विक्रोळी (पश्चिम) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

विक्रोळी गाव, गोदरेज रुग्णालय विक्रोळी (पूर्व) - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद  

विक्रोळी स्थानक मार्ग, विक्रोळी स्थानक ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

गोदरेज कंपनी, रेल्वे लाईनची पश्चिम बाजूचा परिसर - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

सर्वोदय नगर क्षेत्र - सर्वोदय रुग्णालय ते श्रेयस सिनेमा जंक्शन लालबहादूर शास्त्री मार्गाच्या दोन्ही बाजूंचा परिसर - कमी दाबाने पाणीपुरवठा 

कुर्ला उत्तर

बरेली मस्जिद, कुर्ला-अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर-अंधेरी लिंक मार्ग, सावरकर नगर, महात्मा फुले नगर, तानाजी नगर,साकी विहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्य नगर पाईपलाईन - पाणीपुरवठयामध्ये १५ टक्के कपात व उंचावरील भागास कमी दाबाने पाणीपुरवठा 

कुर्ला दक्षिण 

काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, कोहिनूर सिटी, प्रीमियर कॉलनी, बैलबाजार, वाडिया इस्टेट, ख्रिश्चन गांव, संदेश नगर, शास्त्रीनगर, हलावपूल, न्यू मिल मार्ग, ब्राम्हणवाडी, विनोबा भावेनगर, कपाडिया नगर, न्यू म्हाडा कॉलनी, किस्मत नगर, परिघ खाडी, तकियावार्ड, महाराष्ट्र काटा, गफुरखान इस्टेट, पाईपलाईन मार्ग, एल. बी. एस. मार्ग (पूर्व व पश्चिम) इत्यादी भागामध्ये पाणीपुरवठयामध्ये १५ टक्के कपात व उंचावरील भागास कमी दाबाने पाणीरवठा होईल.

चकाला, प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व हनुमाननगर, मोटानगर, शिवाजीनगर, शहिद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद हॉस्पिटल, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरानगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्गक्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदिर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, क्रांती नगर  येथे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी कॉलनी - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक १ ते २३, भंगारवाडी, ट्रान्स आपर्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकुर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

विजय नगर मरोळ, मिलीट्री रोड, वसंत ओआसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा - पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, संत गोरा कुंभार मार्ग - सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद 

प्रेम नगर, नाईक नगर, धारावी लूप रोड -  पाणीपुरवठा पूर्णपणे बंद 

पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्र - पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात

दरम्यान, महापालिकेतर्फे संबंधीत परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या कालावधीत पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे.