शाळेचं गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई : नवी मुंबईतल्या महापालिकेच्या नव्या शाळेचं गेट पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. सौरभ चौधरी असं मृत मुलाचं नावं आहे. तो पाचवीत शिकत होता. याच अपघात आणखी एक विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्या पायाला मोठी दुखापत झालीय. ४० कोटी रुपये खर्चून नुकतीच ही शाळा बांधण्यात आली आहे. अजूनही काम पूर्ण झालेलं नाही. शाळेच्या गेटवर ही मुलं खेळत होती... 

पाचवीत शिकणाऱ्या सौरभ चौधरीचा मृत्यू झाला असून आणखी एका मुलगा यामध्ये जखमी झाला आहे. शाळेचं काम पूर्ण न झाल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे.