मुंबई : राज्यातील सुमारे १२ हजार कर्मचारी आणि अधिकारी या आठवड्यात सेवानिवृत्त झालेत.
एकाच वेळी एवढे अधिकारी निवृत्त झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण एकीकडे एकाच वेळी १२ हजार अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना दुसरीकडे रिक्त होणाऱ्या या पदांवर भरती करण्याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही.
राज्यातील स्रावजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, वनविभाग, नगरविकास, महसूल अशा विविध ३६ खात्यातील हे १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने नव्याने नोकरभरती करण्यास सरकारने बंदी घातलेली आहे.
त्यामुळे या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवी भरती होणार नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार असून प्रशासनावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे.