शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरांनाही फटका

शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या संपाच्या पहिल्या दिवशी शहरांना फारशी झळ बसली नव्हती मात्र आता खऱ्या अर्थानं शहरांवर हा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 

Updated: Jun 2, 2017, 08:44 AM IST
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरांनाही फटका title=

मुंबई : शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या संपाच्या पहिल्या दिवशी शहरांना फारशी झळ बसली नव्हती मात्र आता खऱ्या अर्थानं शहरांवर हा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. 

नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये शेतकरी संपाचा परिणाम दिसून येतोय. आज एपीएमसी मार्केटमध्ये केवळ १४६ गाड्य़ांची आवक झालीय. त्यातही महाराष्ट्राच्या फक्त १५ गाड्यांचा समावेश आहे. उरलेल्या जवळपास १३१ गाड्या परराज्यांतून आल्या आहेत. 

मालाची आवक न झाल्यानं भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात कडाडले आहेत. कोंथिंबरीच्या एका जुडीसाठी १०० रुपयांवर गेलीय तर मेथीची जुडी ५० रुपये आणि पालकाची जुडी २० रुपयांवर पोहचलीय.

हे दर सामान्य दरांच्या दुप्पट असल्याचं स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. इकडे दादरमध्येही भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम झालाय. भाज्यांचे भाव वधारालाय सुरूवात झालीय. दादरमध्ये आज नेहमीपेक्षा ४० टक्के आवक कमी झालीय. त्यातही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची या भाज्या घेऊन येणारे ट्रक बाजारात आलेलेच नाहीत.