मुंबई : मुंबई शहर आणि ठाण्यात स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यात मुंबईत १६ तर ठाण्यात नऊ जणांचा स्वाईन फ्लूमुळं बळी गेलाय. तर ठाण्यात गेल्या दोन महिन्यान ९ जणांचा मृत्यू झालाय.
यात आठ महिलांचा समावेश आहे. ठाण्यात आतापर्यंत स्वाई फ्लूचे १३५ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णाच्या उपचारांसाठी वेगळा कक्ष निर्माण करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे शहरातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी आज दिल्लीचे एक पथक ठाण्यात आले आहे.
तर मुंबईत १६ जून ते २२ जून दरम्यान स्वाईन फ्लू रूग्णांमध्ये ९२ ने वाढ झालीय. याच दरम्यान मलेरीयाचे ९५ आणि गँस्टृोचे २०१ रूग्ण आढळले आहेत. मुंबईत एकूण स्वाईन फ्लू रूग्णांची संख्या ३५३ वर पोहचलीय. जून महिन्यात सर्वाधिक स्वाईन फ्लू रूग्णांची नोंद झालीय.
२००९ मध्ये साथ स्वरूपात आलेला एच१एन१ हा विषाणू वातावरणाचा अविभाज्य भाग झाला असून सीजनल फ्लूप्रमाणे त्याचे वर्तन झाले आहे. वातावरणातील बदल आणि कमाल-किमान तापमानतील फरक हा एच१ एन१ विषाणूंना पोषक ठरत आहे.