धक्कादायक, पार्क केलेल्या 10 ते 12 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड

Vehicles Vandalized in Virar : एक धक्कादायक बातमी. पार्क केलेल्या 10 ते 12 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.  

Updated: Mar 16, 2022, 04:32 PM IST
धक्कादायक, पार्क केलेल्या 10 ते 12 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड title=

प्रथमेश तावडे, विरार : Vehicles Vandalized in Virar : एक धक्कादायक बातमी. पार्क केलेल्या 10 ते 12 वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. विरार पूर्वे फुलपाडा इथल्या पापडखिंड धरणाला  लागून असलेल्या झोपडपट्टी परिसरात पार्क केलेल्या चारचाकींची अज्ञात माथेफिरुंनी तोडफोड केल्याची घटना काल रात्री घडली. 

या घटनेत अज्ञातांनी कारच्या सगळ्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. सकाळ होताच गाडी मालकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी विरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही असे अनेकदा प्रकार झाल्याने पोलिसांनी येथे गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे चोरीसाठी  गाड्यांची तोडफोड केल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

दरम्यान, पापडखिंड धरणाला जवळ असलेल्या या झोपडपट्टीत नशेली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे सांगितले जात आहे. याठिकाणी रात्रभर  गर्दुल्ले येथे ठाण मांडून पार्ट्या  करत असतात. यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाश्यांनी केली आहे.  तसेच येथे दारुडे यांचा उपद्रव होत आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.