शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी काल विधानसभेत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी आज आणखी एक मोठी घोषणा केलीय.

Updated: Mar 16, 2022, 03:45 PM IST
शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा title=

मुंबई : शेतकऱ्यांची मागणी व अडचणींचा विचार करता शेतकऱ्यांना त्वरीत दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्री यांनी विधानसभेत आजही एक घोषणा केलीय. काल ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीज पुरवठा खंडीत केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पुर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याची घोषणा केली होती.

पुढील 3 महिने या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. तसेच, थकबाकीपोटी कृषी ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्याचा निर्णय घेण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्यांनतर आज पुन्हा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आणखी एक मोठी घोषणा केलीय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज देण्यात येणार आहे. यामुळे जास्त भार असलेली विजेची मागणी कमी होईल. या योजनेनुसार शेतकऱ्यांना आपल्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प टाकून विजेची संधी उपलब्ध होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेमधून अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वीज जोडणी देण्यासाठीची योजना करण्यात आली आहे. फक्त ५०० रुपये भरूनही ही वीज जोडणी देण्यात येणार आहे. हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून या योजनेलाही यासाठीची मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा ऊर्जामंत्री यांनी केली. 

त्याचसोबत उपसा जलसिंचन योजनेची थकीत कृषी बिल पंप ३ महिने तोडण्यात येणार नाहीत. तसेच, वीज पुरवठा दिवसाही चालू ठेवण्यात आयोवा अशी मागणी कऱण्यात आलाय होती. त्याचा विचार करून वीज पुरवठा दिवसाही अखंडितपणे सुरु ठेवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.