राज्यात १३ कोटी झाडं लावण्याचा संकल्प

१३ कोटी झाडं लावण्याचा संकल्प सरकारने केलाय. 

Updated: Jul 1, 2018, 04:31 PM IST

मुंबई : राज्यात यावर्षी १३ कोटी झाडं लावण्याचा संकल्प सरकारने केलाय. त्या अंतर्गत कल्याण तालुक्यात वरप गावात या मोहिमेचा शुभारंभ होत झाला. यासाठी वनमहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीरमुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण. चित्रपट निर्माते सुभाष घई उपस्थित होते.