सेक्स करण्यासाठी महिला लागली होती मागे, तरुणाची आत्महत्या

शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी

Updated: Oct 15, 2018, 12:00 PM IST
सेक्स करण्यासाठी महिला लागली होती मागे, तरुणाची आत्महत्या title=

परभणी: वारंवार शरीरसुखाची मागणी करणाऱ्या महिलेच्या त्रासाला कंटाळून परभणीत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सचिन मिटकरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. 

परभणीतील वसमत रोड येथील दत्त धाम येथे राहणाऱ्या सचिन मिटकरी या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी सचिनने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात सचिनने महिलेच्या नावाचा उल्लेख केला आहे. या महिलेने पाच ते सहा दिवसांपूर्वी सचिनवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 

या महिलेने आपले आयुष्य उद्ध्वस्त केले.  माझे लग्न झाले आहे हे तिला माहित असूनही ती माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत होती. शरीरसंबंध ठेवले नाही तर बदनाम करण्याची धमकी ती महिला देत होती. 

त्या महिलेचे आणखी दोन तरुणांशी संबंध असून तिने माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला. याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सचिनने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. 

मोंढा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.