आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत?- नितीन गडकरी

आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या मागण्या नैराश्यातून पुढे आलेल्या आहेत.

Updated: Aug 5, 2018, 08:14 AM IST
आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत?- नितीन गडकरी title=

औरंगाबाद: आरक्षणाचा प्रश्न हा नैराश्यातून निर्माण झाला आहे. त्याचे कारण ग्रामीण भागात रोजगार नाही. शैक्षणिक सुविधा नाहीत. अशा परिस्थितीत आरक्षण मिळाले तरी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. ते शनिवारी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या मागण्या नैराश्यातून पुढे आलेल्या आहेत. वाढती बेरोजगारी, शेतीमालाला न मिळणारा भाव यातून आरक्षणाची मागणी पुढे येत आहे.आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांचे विचार जाणून घेऊन पावले उचलली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कामी लक्ष घालत आहेत, असे सांगत त्यांनी राज्य सरकारची पाठराखण केली. 

आरक्षणाचा प्रश्न हा नैराश्यातून निर्माण झाला आहे. त्याचे कारण ग्रामीण भागात रोजगार नाही. शैक्षणिक सुविधा नाहीत. शेतीमालास भाव नाही. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्राधान्याने विविध माध्यमातून प्रयत्न करत आहे.

गरीब हा गरीब असतो. त्याला जात, धर्म, पंथ नसतो. प्रत्येक समाजात असा वर्ग असतो. त्याचाही विचार केला जावा. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाबाबत सर्वांनी विचार करुन संमत तोडगा काढला पाहिजे, असे आवाहन यावेळी गडकरींनी केले.