महावितरणाची एक चूक अन् शेतकऱ्याच्या 4 म्हशी, 250 कोंबड्या जळून ठार

Beed | वडवणी तालुक्यातील बावी तांडा परिसरात ही आगीची घटना घडली.  33 केव्हीची विद्युत तार तुटून दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांचा तब्बल 13 एकर ऊस जळून खाक झाला. 

Updated: Mar 15, 2022, 01:26 PM IST
महावितरणाची एक चूक अन् शेतकऱ्याच्या 4 म्हशी, 250 कोंबड्या जळून ठार title=

बीड : वडवणी तालुक्यातील बावी तांडा परिसरात ही आगीची घटना घडली.  33 केव्हीची विद्युत तार तुटून दामू राठोड आणि शेषेराव राठोड यांचा तब्बल 13 एकर ऊस जळून खाक झाला. 

या आगीत प्रल्हाद आडे यांचाही गोठा जळून खाक झालाय. तसेच चार म्हशी आणि 250 कोंबड्याचा ही मृत्यू झाला. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासह संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शेतकरी कुटुंबाची  अक्षरशः धावपळ झाली.

अहमदनगरमध्येही शॉर्ट सर्किटमुळे आग

अमहदनगर जिल्ह्यातील गणेशवाडी आणि खेडले काळजी या गावात शार्टसर्किटमुळे आग लागली..या आगीत 44 एकर ऊस जळून खाक झालांय..गणेशवाडीतल्या एका शेतात आग लागली..

आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत 40 एकर शेत जळून खाक झालं होतं तर दुसरीकडे खेडले काळजी इथे 4 एकर शेत जळून खाक झालं . 

पुण्यात अप्पर बस डेपोला आग

पुणे अप्पर बस डेपोच्या मागे भीषण आग लागली. ही आग अण्णा भाऊ साठेनगरमधल्या खाद्यपदार्थांच्या कारखान्यात लागली. 

आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.