औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लसीकरणाचे नियम प्रशासनाकडून आणखी कडक करण्यात आले आहेत. नागरिकांनी लस घेतली नसेल तर त्यांना मद्य खरेदी करता येणार नाही.
लस न घेतलेल्यांना दारू मिळणार नाही, असा निर्णय औरंगाबाद शहर प्रशासनाने घेतला आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ही शक्कल अवलंबण्यात आली आहे.
नियमांचं उल्लंघन केल्यास दुकानं सील
औरंगाबादेमध्ये लसीकरणासाठी आणखी कडक नियम आखण्यात आले आहेत.
पेट्रोल पंप, रेशन दुकानांनंतर आता लसीकरणाचं प्रमाणपत्र नसल्यास मद्य प्रेमींना दारू सुद्धा मिळणार नाही.
दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस आणि ग्राहकांचा पहिला डोस तरी झाला असेल, तरच ग्राहकांना दारू विकता येणार आहे.
या नियमांची अंमलबजावणी न केल्यास दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.